पुणे : लोणी काळभोर भागात घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. घरफोडीच्या गुन्ह्यात चोरटा गेले तीन वर्ष फरार होता.दत्ता शाम गिरी (वय २२, रा. बिराजदारनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. २०२१ मध्ये गिरीने लोणी काळभोर परिसरात घरफोडी केली हाेती. घरफोडीच्या गुन्ह्यात गिरी गेले तीन वर्ष फरारी हाेता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पथक हडपसर भागात गस्त घालत होते. बिराजदारनगर परिसरातील कालव्याजवळ गिरी थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी नितीन मुंढे यांंना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. चौकशीत गिरीने तीन वर्षांपूर्वी लोणी काळभोर भागात घरफोडी केल्याचे उघड झाले.पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबे, ऋषीकेश ताकवणे यांनी ही कारवाई केली.