पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, रांजणगाव, खेड परिसरातील मंदिरांत चोरी करणाऱ्या चोरट्याला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्याने ग्रामीण भागातील ११ मंदिरांत चोरी केल्याचे उघड झाले असन, त्याच्याकडून चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.

विनायक दामू जिते (रा. कान्हूर मेसाई, ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खेड भागातील मंदिरांतून रोकड चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. सराइत चोरटा जितेने चोरी केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, अमोल वडेकर, संजय साळवे, मंगेश अभंग यांना तपासात मिळाली. तो शिक्रापूर परिसरात येणार असल्याची महिती मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडले, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे या वेळी उपस्थित होते.

Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
navi mumbai firing
नवी मुंबई : सानपाडा गोळीबार प्रकरणी एक अटक
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
thane palghar gold chain snatcher loksatta news
ठाणे, पालघरमध्ये सोनसाखळ्या चोरणारे गुजरातचे दोन सराईत चोरटे अटकेत, २० गुन्हे केल्याची चोरट्यांची कबुली
kalyan Dombivli police
कल्याण – डोंबिवलीत चोरीचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत
Nagpur Police seized Rs 3 crore worth of stolen goods returning them to complainants
“तुमच्या घरातून चोरी झालेले दागिने सापडले…” पोलिसांनी ३ कोटींचा मुद्देमाल…
house burglar Incidents Balewadi, Sinhagad road area pune
घरफोडीत साडेआठ लाखांचा ऐवज चोरीला; बालेवाडी, सिंहगड रस्ता परिसरातील घटना

हेही वाचा >>>माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची पोलिसांत धाव; मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केलं होतं विधान

जितेने ग्रामीण भागातील वेगवेगळ्या मंदिरांत चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. जिते सराइत आहे. मंदिरात रात्रीच्या वेळी भाविकांची वर्दळ कमी असते. जितेने मध्यरात्री गुन्हे केले. त्याच्याकडून एक लाख ६३ हजारांचे दागिने, एक लाख १७ हजारांचे चांदीचे मुखवटे, ८० हजारांचे पूजासाहित्य जप्त करण्यात आले.

हेही वाचा >>>पुणे : कर्ज फेडण्यासाठी दुचाकी चोरी; चोराला अटक

ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, अविनाश कालेकर, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित मडके, शांताराम सांगडे, रमेश इचके, संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, नवनाथ राक्षे, गजानन डाके, ओमनाथ तुमकुटे, राजेश उतळे, विक्रम तापकीर, नीलेश सुपेकर, मंगेश थिगळे यांनी ही कारवाई केली, तसेच पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, लाखणगाव पोलीस पाटील कल्पना बोऱ्हाडे यांनी तपासात साहाय्य केले.

Story img Loader