नारायण पेठेतील गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सव्वा लाख रुपये किमतीची अत्तरे, शाम्पुच्या बाटल्या चोरल्याचा प्रकार उघडकीस आला.याबाबत नवनीत वसंत बिहाणी ( रा. नारायण पेठ ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिहाणी यांचे नारायण पेठेतील सतीश धाम सोसायटीत गोदाम आहे.
त्यांनी निरनिराळ्या प्रकारची अत्तरे, अत्तराचे फवारे, शाम्पू, बॉडी लोशन असा माल गोदामात ठेवला होता. चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून अत्तरे, शाम्पूच्या बाटल्या; तसेच बाॅडी लोशनच्या बाटल्या चोरल्या. गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपाससाठी ताब्यात घेतले असून विश्रामबाग पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.