पुणे : बँकेतून तारण ठेवलेले दागिने पुन्हा ताब्यात घेउन घरी जात असताना एका ज्येष्ठाला उपहारगृह दिसले. वडापाव खायची इच्छा त्यांना झाली. दागिन्यांची पिशवी दुचाकीच्या हँडलला लटकविणे जेष्ठाला महागात पडले. दुचाकीला लटकविलेली पाच लाख रुपयांचे दागिने ठेवलेली पिशवी चोरट्यांनी चोरून नेली. हडपसरमधील शेवाळेवाडी पीएमपी बसस्थानकाजवळ ही घटना नुकतीच घडली.
याबाबत एका ज्येष्ठाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या पत्नीचे दागिने उरळी कांचनमधील एका बँकेत तारण ठेवले होते. गुरुवारी (२९ ऑगस्ट) त्यांनी बँकेत तारण ठेवलेले दागिने कर्ज भरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर ते पत्नीसह दुचाकीवर मांजरीकडे निघाले होते.
हे ही वाचा…पुणे : कोथिंबिरीला उच्चांकी भाव, किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये दर
शेवाळेवाडी परिसरात त्यांनी एक उपहारगृह पाहिले भूक लागल्याने ज्येष्ठाने दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबविली. दागिन्यांची पिशवी दुचाकींच्या हँडलला अडकवून दोघे वडापाव खाण्यासाठी शेजारील उपहारगृहात गेले. नेमकी त्याचवेळी चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून दागिन्यांची पिशवी चोरून नेली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी श्रीकांत पांडुळे तपास करत आहेत