लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: औंध परिसरातील राजभवन तसेच राष्ट्रीय रायायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आवारातून चंदनाची झाडे कापून नेणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला चतु:शृंगी पोलिसांनी पकडले. चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात सात ठिकाणी चंदन चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून २५ किलो चंदनाची लाकडे जप्त करण्यात आली आहेत.

कैलास साहेबराव अगिवले (वय २१, रा. बाभुळवडे, जि. नगर), सुनिल सुरेश अगिवले (वय २०, रा. संगमनेर, नगर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपींना पाषाण रस्त्यावरील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या परिसरातून अटक करण्यात आली. शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चंदन चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. राजभवन आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आली होती. पोलीस कर्मचारी सुरेश काशीद आणि अशोक ननवरे रात्रपाळीत गस्त घालत होते. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आवारात आरोपींना पोलिसांनी पाहिले. पोलिसांना पाहताच दोघे जण पळाले. पोलिसांनी पाठलाग करुन दोघांना पकडले.

आणखी वाचा- पिंपरीत मोकाट श्वानांचा उपद्रव; मानवी हक्क आयोगाकडे दावा

आरोपी अगिवले यांच्याकडून २५ किलो चंदनाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, कपील भालेराव, शेरू वाघवले, इरफान मोमीन, आशिष निमसे, बाबुलाल तांदळे, मारुती केंद्रे आदींनी ही कारवाई केली.