कल्याणीनगर भागात महिलेची पिशवी हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना येरवडा पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून सात मोबाइल संच आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.अदित्य उर्फ बच्चू भारत जाधव (२०, रा. वडगाव शेरी), राज महेश कांबळे (२१, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहे. येरवड्यातील कल्याणीनगर भागात तरुणी आणि मैत्रीण निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी तिच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेला होता. पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.आरोपी जाधव हा तरुणीचा मोबाइल संच वापरत असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी जाधवला पकडले. चौकशीत साथीदाराचे नाव निष्पन्न झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे: ‘सर्वकार्येषु सर्वदा’ने लढण्याला बळ; राज्याच्या विविध भागांत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची भावना

जाधव आणि कांबळे यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात मोबाइल हिसकावण्याचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दोघांकडून सात मोबाइल संच आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण घुटे, तुषार खराडे, राहुल परदेशी आदींनी ही कारवाई केली.