पुणे : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, घोरपडी भागातील एका लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेले. चोरट्यांनी पर्वती भागातील मित्रमंडळ काॅलनीतील एका बंगल्यातील चंदनाचे झाड कापून नेल्याचे उघडकीस आले.
याबाबत एका लष्करी अधिकाऱ्याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार लष्करी अधिकाऱ्याचा घोरपडी परिसरातील नेहरू मार्गावर बंगला आहे. गुरुवारी मध्यरात्री चंदन चोरटे लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात शिरले. चोरट्यांनी आवारातील चंदनाचे झाड कापून नेले. बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकी आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सांगोलकर तपास करत आहेत.
हे ही वाचा…पिंपरी- चिंचवड: बहिणीच्या प्रियकराची भावाने केली हत्या; तीन जण ताब्यात, आज सकाळीच आढळला होता मृतदेह
पर्वती भागातील मित्रमंडळ काॅलनीतील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका रहिवाशाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदाराच्या बंगल्याच्या आवारात गुरुवारी मध्यरात्री चंदन चोरटे शिरले. चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेले. पोलीस हवालदार जगताप तपास करत आहेत. शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील ‘आयूका’ संस्थेतून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली होती. महिनाभरापूर्वी चोरट्यांनी विद्यापीठाच्या आवरातील पाच चंदनाची झाडे कापून नेली होती.
हे ही वाचा…सराफी पेढीतून ३२ लाखांचे दागिने चोरून कारागिर पसार; रविवार पेठेतील घटना
चंदन चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, तसेच सोसायटी, बंगल्याच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील एका बंगल्यात शिरलेल्या चाेरट्यांनी वकील महिलेला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून चंदनाचे झाड चोरून नेले होते. शहराच्या वेगवेगळ्या भागात चंदन चोरी करणाऱ्या चोरट्यांनी पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.