पुणे : मोटारचालकांकडे बतावणी करून मोटारीतील महागड्या वस्तू, रोकड, लॅपटाॅप लांबविणाऱ्या तामिळनाडूतील चोरट्यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांच्या टोळीने शहरात आठ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांच्याकडून एक लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजशेखर धनशिलन (वय ३७), गिरीधरन उमानाथ (वय २०, दोघे रा. रामजीनगर, तिरुचिरापल्ली, तामिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. ढोले पाटील रस्त्यावरील एका औषध विक्री दुकानासमोर मोटारचालक थांबला होता. मोटारचालकाने त्याच्याकडील पिशवीत लॅपटाॅप तसेच अन्य साहित्य ठेवले होते. चोरट्यांनी मोटारचालकाकडे बतावणी करून लॅपटाॅप ठेवलेली पिशवी लांबविली होती. मोटारचालकाने याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली होती.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
Donald Trumps legal cases
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गुन्हेगारी खटल्यांचे काय होणार? त्यांची निर्दोष मुक्तता होणार?

हेही वाचा – पुणे: अनधिकृत जाहिरात फलकांवर संथ गतीने कारवाई

कोरेगाव पार्क पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चोरटे शिवाजीनगर परिसरातील स. गो. बर्वे चौकात (माॅडर्न कॅफे) थांबल्याची माहिती तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून धनशिलन आणि उमानाथ यांना पकडले. चौकशीत त्यांनी मोटारचालकांकडे बतावणी करून मोटारीतील मुद्देमाल लांबविण्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरट्यांनी रस्त्यात पैसे पडले आहेत तसेच मोटारीचे चाक पंक्चर झाल्यची बतावणी करून मुद्देमाल लांबविण्याचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा – पुणे: मालमत्ता कराची देयके गेल्यावर्षीप्रमाणेच! पाणीपट्टीत १५ टक्के वाढ; कर रकमेत अल्पवाढीची शक्यता

चोरट्यांनी कोरेगाव पार्क, एरंडवणे, शिवाजीनगर, डेक्कन परिसरात मोटारचालकांकडे बतावणी करून मुद्देमाल लांबविण्याचे आठ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त आर. एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ, सहायक निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, नामदेव खिलारे, विजय सावंत, विशाल गाडे, रामा ठोंबरे, विलास तोगे आदींनी ही कारवाई केली.