लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पालखी सोहळ्यात दर्शन घेणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील एक लाख ३५ हजारांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली.

याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि तिची मैत्रीण गणेशखिंड रस्त्यावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेली होती. त्या वेळी चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांचे सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरुन नेले. पोलीस कर्मचारी काळे तपास करत आहेत.

आणखी वाचा-पुणे: पतीला धडा शिकविण्यासाठी कंपनीची कार बॉम्बने उडविण्याची धमकी; महिला अटकेत

विश्रांतवाडीतील कळस परिसरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करत आहेत.

Story img Loader