पुणे : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून कात्रज, सोलापूर रस्ता परिसरात वेगवेगळ्या घटनेत तिघांना लुटण्यात आल्याची घटना घडली. कात्रज भागातील सावंत विहार सोसायटी परिसरातून जात असलेल्या पादचारी महिलेच्या हातातील ७० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात तपास करत आहेत. हडपसर भागात एका प्रवाशाला मोटारचालकाने लुटल्याची घटना घडली. याबाबत नवनाथ झाडे (वय ३४, रा. ओंकार काॅलनी, थेरगाव, पिंपरी-चिंचवड) यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झाडे बाहेरगावी निघाले होते. सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात ते बसची वाट पाहत थांबले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एक मोटारचालक तेथे आले. कोठे निघाला, अशी विचारणा मोटारचालकाने केली. त्यानंतर चोरट्याने त्यांना मोटारीतून मूळगावी सोडण्याची बतावणी केली. चोरट्याने त्यांना मोटारीत धमकावले. त्यांना चाकूचा धाक दाखविला. झाडे यांच्याकडील रोकड, दोन मोबइल संच तसेच महत्त्वाची कागदपत्रे असा ५६ हजार रुपयांचा ऐवज मोटारचालकाने लुटला. झाडे यांना पुणे-सोलापूर रस्त्यावर यवत परिसरात सोडून चोरटा पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.
शहरात चोरट्यांचा धुमाकूळ कात्रज, सोलापूर रस्ता परिसरात लूटमार
शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून कात्रज, सोलापूर रस्ता परिसरात वेगवेगळ्या घटनेत तिघांना लुटण्यात आल्याची घटना घडली.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-07-2022 at 15:03 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves rampage city katraj solapur road area pune print news ysh