लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडील बुलेट चोरून चोरटा पसार झाल्याची घटना कोंढवा भागात घडली. खरेदीचा बहाणा करुन पसार झालेल्या तरुणाविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Home buyers cheated in Kalyan Dombivli
कल्याण, डोंबिवलीत घर खरेदीदारांची फसवणूक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…

याबाबत अल्तमश जरीफ शेख (वय २७, रा. रामटेकडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शेख हे उंड्री भागातील जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे कामाला आहेत. २६ ऑक्टोबर रोजी ते दुकानात थांबले होते. त्यावेळी एक तरुण दुचाकी खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला. त्याने दुचाकींची पाहणी केली. त्यावेळी दुकानात असलेली एक बुलेट त्याला पसंत पडली.

आणखी वाचा-आंतरराष्ट्रीय प्रकल्पात भारताला मोठी संधी! प्रादेशिक विदा केंद्र उभे राहणार

शेख याला तरुणाने विश्वासात घेतले. बुलेटवर रपेट मारून येतो, असे त्याने त्यांना सांगितले. त्यानंतर तो बुलेट घेऊन रपेट मारण्यासाठी बाहेर पडला. बुलेट घेऊन पसार झालेला तरुण न परतल्याने शेख यांना संशय आला. ते त्याची वाट पाहत थांबले. त्यांनी तरुणाचा शोध घेतला. बुलेट घेऊन तो पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मालकाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कोंढवा पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या बुलेट चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.

Story img Loader