प्रवासी असल्याचा बहाणा करुन चोरट्यांनी रिक्षा चालकाला प्रसादातून गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर चालकाच्या गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना पुण्यातील पद्ममावती भागात घडली. याबाबत रिक्षाचालक अशोक बाबुराव सोनवणे (वय ६५, रा. गणेश चेंबर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे स्टेशन परिसरात चोरट्यांनी प्रवासी असल्याचा बहाणा करुन रिक्षाचालक सोनवणे यांना रिक्षा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे नेण्यास सांगितले. चोरट्यांनी दर्शन घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर चोरट्यांनी रिक्षाचालक सोनवणे यांना प्रसादातून गुंगीचे औषध दिले. रिक्षा पद्ममावती येथे नेण्यास सांगितले. प्रसादातून गुंगीचे औषध दिल्यानंतर रिक्षाचालक सोनवणे यांना गुंगी आली.

हेही वाचा : पुण्यात ३,१४८ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती, १२ कोयते, तलवारी, चाकू जप्त, १८ जणांना अटक

सोनवणे यांनी रिक्षा पद्ममावती परिसरात थांबविली. ते बेशुद्ध पडल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविली. काही वेळानंतर सोनवणे शुद्धीवर आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक शेंडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader