पुणे : दिवाळीनिमित्त लक्ष्मी रस्ता परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांकडील ऐवज, तसेच मोबाइल संच चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लक्ष्मी रस्ता परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. जोगेश्वरी मंदिर परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून १५ हजारांची रोकड चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली.

याबाबत एकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात राहायला आहेत. दिवाळीनिमित्त तक्रारदार आणि त्याची पत्नी लक्ष्मी रस्ता परिसरात खरेदीसाठी आले होते. गर्दीत चोरट्यांनी तक्रारदाराच्या पत्नीच्या पिशवीतून ७७ हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे तपास करत आहेत.

हेही वाचा >>>थायलंडमध्ये प्रति ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर, फुकेतमध्ये ‘लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय’ लवकरच खुले

जोगेश्वर मंदिर परिसरातील गल्लीत कपडे खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून १५ हजारांची रोकड चोरुन नेण्यात आली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बाणेर परिसरात राहायला आहेत. मंगळवारी (२९ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास त्या जोगेश्वरी मंदिर परिसरातील गल्लीत कपडे खरेदीसाठी आल्या होत्या. गर्दीत चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून १५ हजारांची रोकड चोरून नेली. पोलीस कर्मचारी साबळे तपास करत आहेत.

खडकी बाजार परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरुन नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.