पुणे: नामांकित वस्त्रदालनातून चोरट्यांनी कपडे, तसेच रोकड असा चार लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना खराडी भागात घडली.
याबाबत पंकजकुमार यादव (वय ३६, रा. केसनंद रस्ता, वाघोली) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यादव खराडी बाह्यवळण मार्गावरील पीटर इंग्लड वस्त्रदालनात व्यवस्थापक आहेत. चोरट्यांनी मध्यरात्री वस्त्रदालनाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला.
हेही वाचा…. शिवसृष्टीच्या उभारणीसाठी गुजरात सरकारचा हातभार… दिली एवढ्या कोटींची देणगी
गल्ल्यातील ४१ हजार १८७ रुपये आणि शर्ट, पॅण्ट असे कपडे चोरून नेले. चोरट्यांनी वस्त्रदालनातून चार लाख ६४ हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.