पुणे : पीएमपी प्रवासी महिलेचे तीन लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
हेही वाचा >>> पुण्यात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू, संगणक अभियंता महिलेवर गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला मूळची सातारा जिल्ह्यातील पाटण येथील रहिवासी आहे. स्वारगेट स्थानकातून त्या पीएमपी बसने जात होत्या. गर्दीत चोरट्यांनी तक्रारदार महिलेच्या पिशवीची चेन उघडली. त्यानंतर पिशवीत ठेवलेले तीन लाख दहा हजार रुपयांचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले.
हेही वाचा >>> देहूतील तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी राहणार खुले; केवळ १४ जूनला बंद!
पुढे शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकातील थांब्यावर त्या उतरल्या. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप तपास करत आहेत.
हेही वाचा >>> पुणे : गु्न्हे शाखेचा वातानुकूलित जुगार अड्डयावर छापा, पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
दरम्यान, शहरात गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी प्रवाशांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे बसमध्ये शिरुन महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांकडील ऐवज लांबवितात.