पुणे : गृहप्रकल्पातील स्लॅबसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेट चोरणाऱ्यांना अटक करण्यात आली. चोरट्यांकडून एक लाख दहा हजार रुपयांच्या दिडशे प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. दत्ता धनाजी पाटोळे (वय २०), साहील दत्ता ढावरे (वय १९ दोघे रा. पद्मावती) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कात्रज भागातील जांभुळवाडी परिसरात एका गृहप्रकल्पातून बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी प्लेट चोरीस गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत होता. तपासात एका अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने लोखंडी प्लेट चोरल्याची माहिती मिळाली. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याने साथीदार पाटोळे, ढावरे यांच्या मदतीने लोखंडी प्लेट चोरल्याची कबुली दिली.

हेही वाचा – कुलगुरू निवड प्रक्रिया पुन्हा लांबणीवर, निवडीसाठी नवीन समितीची नियुक्ती

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, हर्षल शिंदे, राहुल तांबे आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves stolen construction material in katraj area arrested pune print news rbk 25 ssb