पुणे : दिवाळीत वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी सदनिकेतून नऊ लाखांचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. वारजे आणि लोणी काळभोर परिसरात चोरीच्या घटना घडल्या.
याबाबत एका महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वारजे भागातील तावरे बिल्डींगमध्ये राहायला आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांच्या सदनिकेचा दरवाजा उघडा होता. लक्ष्मीपूजनानिमित्त त्यांनी देवघरात सोन्याचे दागिने ठेवले होते. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर त्या कपाटात दागिने ठेवण्यास विसरल्या. चोरट्याने देवघरात पूजनासाठी ठेवलेले दागिने आणि रोकड असा सात लाख २० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेच्या घरात चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.
हेही वाचा >>> ऐन दिवाळीत टोळक्याची दहशत; १३ वाहनांची तोडफोड- ओैंधमधील महापालिका वसाहतीतील घटना
लोणी काळभोर भागातील एका महिलेच्या घरातून एक लाख ७६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. तक्रारदार महिलेने लक्ष्मीपूजनानिमित्त दागिने कपाटातून काढून ठेवले होते. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर महिलेने दागिने टेबलवर ठेवले होते. कपाटात दागिने ठेवण्याच्या त्या विसरल्या. चोरट्यांनी टेबलवरील पावणेदोन लाखांचे दागिने चोरून चोरटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.
हेही वाचा >>> दिवाळीत एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेकडील दोन लाखांचे दागिने लंपास
दिवाळीत सतर्क रहा दिवाळीत अनेकजण सहकुटुंब बाहेरगावी जातात. चोरटे बंद सदनिकांची पाहणी करुन चोरी करतात. बाहेरगावी जातना शेजारी, तसेच सोसायटीतील रखवालदाराला माहिती द्यावी. दरवाज्याचे कुलूल, लोखंडी जाळी व्यवस्थित लावले की नाही, याची खात्री करा. गच्चीतील दरवाजा व्यवस्थित बंद करावा, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे.