लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुटणाऱ्या चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी वारजे परिसरात एका दुचाकीस्वाराल धमकावून त्याला लुटल्याचे तपासात उघडकीस आले.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता

याप्रकरणी कासीम आसिफ अन्सारी (वय २२, रा. मोमीनपूरा, गंज पेठ), अनिकेत अनिल फासगे (वय २२ रा. गंज पेठ), आश्रफ गौस सय्यद (वय २०, रा. म्हाडा वसाहत, वैदुवाडी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत एका तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुण सदाशिव पेठेत राहायला आहे. १२ ऑगस्ट रोजी तो दुचाकीवरुन मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लक्ष्मी रस्त्याने निघाला होता. सेवासदन शाळेसमोर आरोपी अन्सारी, फासगे, सय्यद आणि साथीदार दुचाकीवरून आले. त्यांनी दुचाकीस्वार तरुणाला अडवले.

आणखी वाचा-पुणे : सायबर चोरट्यांकडून संगणक अभियंत्याची एक कोटींची फसवणूक

अंगावर थुंकला का ? अशी विचारणा करून तरणाला धमकावले, तसेच त्याला धक्काबुक्की करून गळ्यातील सोनसाखळी चोरून चोरून नेली. घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपास पथकाने लक्ष्मी रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. आरोपी बुधवार पेठेतील क्रांती चौक परिसरात थांबल्याची महिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपींना सापळा लावून ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, मयूर भोसले, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, सातप्पा पाटील, संतोष शेरखाने, सागर मोरे यांनी ही कारवाई केली.