बारामती : संत निरंकारी मिशनची सेवा भावना आणि मानव कल्याणाचा संकल्प साकार करण्याच्या हेतुने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ रविवार, दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि सत्कारयोग्य निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात रविवारी (ता. २३) यमुना नदीच्या छठ घाट, आई.टी.ओ. दिल्ली येथे केला जात आहे.या परियोजनांतर्गत संत निरंकारी मिशन बारामती येथील दशक्रिया विधी घाट व कऱ्हा नदी परिसरात साफसफाई करण्यात येणार असल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी सकाळी ७ ते १० यावेळात होणाऱ्या स्वच्छ जल, स्वच्छ मन परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी बारामतीसह शेठफळ गढे व मदनवाडी परिसरातून मोठया संख्येने निरंकारी अनुयायी भाग घेणार असल्याचेही श्री. झांबरे यांनी सांगितले. जल संरक्षण व स्वच्छतेच्या प्रति जागरूकता निर्माण करणे हा या परियोजनेचा उद्देश आहे, जेणेकरुन भावी पिढ्यांना निर्मळ जल आणि स्वस्थ पर्यावरणाचे वरदान प्राप्त होऊ शकेल.संत निरंकारी मिशनने बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणादायक शिकवणूकींना आत्मसात करत वर्ष २०२३ मध्ये संस्कृति मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ केला गेला. या दिव्य पुढाकाराचा उद्देश केवळ जलस्रोतांची स्वच्छता सुनिश्चित करणे इतकाच नसून जल संरक्षणाला मानवी जीवनाचे अभिन्न अंग बनविण्याचा विचार विकसित करणे हा आहे. नद्या, सरोवरे, तलाव, विहिरी आणि झरे यांसारख्या प्राकृतिक जलस्रोतांची स्वच्छता व संरक्षणाला समर्पित या महाअभियानाच्या पहिल्या दोन टप्प्यांना अभूतपूर्व यश प्राप्त झाले आहे.

याच प्रेरणेतून यावर्षी तृतीय टप्पा अधिक व्यापक, प्रभावी व दूरगामी दृष्टीकोनातून वाढविण्यात आला आहे ज्यायोगे हे अभियान सातत्याने विस्तारीत होऊन समाजामध्ये जागरुकता, सेवा आणि समर्पणाची एक सशक्य लाट उत्पन्न करु शकेल. संत निरंकारी मंडळाचे सचिव श्री.जोगिंदर सुखीजाजी यांनी माहिती देताना सांगितले, की हे बृहत अभियान देशभरातील २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९०० पेक्षा अधिक शहरांमध्ये १६०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात येईल. या महाअभियानाची ही अभूतपूर्व व्यापकता त्याला एक ऐतिहासिक स्वरूप देईल ज्यातून जल संरक्षण व स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावशाली रीतीने जनसामान्यांपर्यंत पोहचू शकेल. #