नमस्कार मी पार्थ अजित पवार.. आज माझं पहिलं भाषण आहे ते ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यासमोर त्यामुळं काही चुकलं तर सांभाळून घ्या, असे आवाहन करीत मवाळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील पहिल्या प्रचार सभेला संबोधित केले.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, नेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, विलास लांडे, सचिन साठे, संजोग वाघेरे आदी नेते उपस्थित होते.
पार्थ पवार म्हणाले, भाजपच्या काळात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि भ्रष्टाचारात वाढ झाली असून अनेक आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना येथे अनेक विकास कामे झाली. ही कामे आजच्या सरकारने केलेली नाहीत. सोशल मीडियावर वावर असणारे हे केवळ डिजिटल सरकार आहे, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडेल, बारामतीप्रमाणे मावळचाही विकास करेन असे आश्वासन यावेळी पार्थ पवार यांनी मावळच्या जनतेला दिले.