भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांवर मोठा आरोप केला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना बेनामी संपत्ती प्रकरणी अटक केलेली असतानाही ते राजीनामा देत नाहीत, शिवाय महाविकास आघाडीचे नेते देखील मलिक राजीनामा देणार नसल्याचं बोलत आहेत, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “नवाब मलिक यांना बेनामी जमीन विकत घेण्याच्या आरोपाखाली ईडीने अटक केली आहे. ईडीने अटक केल्यानंतर देखील ते राजीनामा देत नाहीत. महाविकास आघाडीचे नेते देखील नवाब मलिक राजीनामा देणार नाहीत, असं सांगतात. याचा अर्थ १९९३ च्या बॉम्बस्फोटात सहभागी झालेल्या दाऊदच्या नेतृत्वातील सगळ्या गुन्हेगारांना हे पाठबळ देत आहेत. त्यावेळचे बॉम्बस्फोट कसे बरोबर होते, त्यांना मदत करणारे नवाब मलिक कसे बरोबर होते असं सांगण्याचा, असं दाखवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. भाजपा हा प्रयत्न सहन करणार नाही.”

तसेच, “सुरूवातीला समझने वालो को इशारा काफी…. या प्रमाणे आम्ही तीन दिवस निदर्शने केली पण आता आणखी एखादा दिवस वाट पाहून या सगळ्या विषयातली खूप तीव्र प्रतिक्रिया भाजपा सुरू करेल. एखादा सरकारी कर्मचारी अटक झाल्यानंतर २४ तासांच्या आत त्याला निलंबित करायचं असतं आणि आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याला नोकरीतून काढायचं असतं. तर मग ते एका मंत्र्यासाठी ते लागू नको का?” असंही चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.