पुणे : माझ्यावर कारवाई करणार्‍यांना (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर) हवेली तालुका समजून घेण्यास दहा जन्म घ्यावे लागतील, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना विकास दांगट यांनी टोला लगावला. हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत विकास दांगट यांचा अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनल विजयी झाला आहे. यावर विकास दांगट यांना विचारले असता त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपाच्या पॅनलच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला १८ पैकी १३ जागांवर दणदणीत विजय मिळविण्यात यश आले आहे. तर राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे २ उमेदवार विजयी, तर ३ जागांवर स्वतंत्र पॅनलचे उमेदवार विजयी झाले.

हेही वाचा – ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा’चे शुक्रवारी राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विकास दांगट यांनी स्वतंत्र पॅनल तयार करून सर्वपक्षीय उमेदवारांना संधी दिली होती. त्यामुळे ही निवडणूक विशेष अर्थाने चर्चेत राहिली. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी विकास दांगट यांची पक्षातून हकालपट्टी करीत असल्याचे जाहीर केले होते. त्या निर्णयानंतर गारटकर आणि दांगट या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. या सर्व राजकीय घडामोडीदरम्यान हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत विकास दांगट यांचा अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलच विजयी झाला आहे.

हेही वाचा – पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी, अडते गटातून जय शारदा गजानन पॅनेलचे गणेश घुले, अनिरुद्ध भोसले विजयी

विकास दांगट म्हणाले की, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलवर सर्वांनी विश्वास दाखवत मतदान केले. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. त्यामुळे हा विजय तालुक्यातील सर्वांचा आहे. येत्या काळात तालुक्यात विविध माध्यमांतून विकास कामे निश्चितपणे दिसून येतील. तसेच माझ्यावर कारवाई करणार्‍यांना (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर) हवेली तालुका समजून घेण्यास दहा जन्म घ्यावे लागतील, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना विकास दांगट यांनी टोला लगावला. अजित पवार यांची भेट घेणार का, या प्रश्नावर विकास दांगट म्हणाले की, ते राज्याचे नेते असून जस्ट वेट अ‍ॅण्ड वॉच अशी भूमिका त्यांनी मांडली.