लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : शहरातील औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक, संस्थात्मक, वैद्यकीय मालमत्तांचे अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत ३० हजार २४६ आस्थापनांची पाहणी केली. त्यातील केवळ तीन हजार ३६३ आस्थापनांकडेच अग्निशमन विभागाचा सुरक्षा दाखला असल्याचे समोर आले. दाखला नसलेल्या २७ हजार १५६ आस्थापनांवर दंडात्मक, फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

Person carrying pistol is arrested action taken in Karvenagar area
पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआड, कर्वेनगर भागात कारवाई
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Fire breaks out in a flat on NIBM Road in Kondhwa Pune news
पुणे: कोंढव्यात सदनिकेत आग; महिलेचा मृत्यू
bull hit a man in dound pune
VIDEO: पायी जाणाऱ्या नागरिकाला वळूने शिंगाने उचलून आपटले, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
New fire station constructed at Kandivali and Kanjurmarg
मुंबईत सात नवी अग्निशमन केंद्र कांदिवली, कांजूरमार्ग येथील केंद्र बांधून तयार
Fire breaks out on ground floor of apartment in Akola 11 two-wheelers gutted
अकोल्यात अपार्टमेंटच्या तळ मजल्याला आग; ११ दुचाकी जळून खाक
Bmc to buy dust control equipment
धुळीची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिका अद्ययावत यंत्रे खरेदी करणार
mumbai scrap shops loksatta news
मुंबई : कुर्ला येथे भीषण आगीत भंगार दुकाने जळून खाक

चिखलीतील हार्डवेअरच्या दुकानास ३० ऑगस्ट रोजी आग लागली होती. या आगीत दुकानातील पोटमाळ्यावर झोपलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा घटना शहरात घडू नयेत यासाठी महापालिकेने व्यावसायिक गाळ्याचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले. महिला बचतगटांमार्फत हे सर्वेक्षण केले जात आहे. शहरात ९० हजारांहून अधिक व्यावसायिक आस्थापना आहेत. आतापर्यंत ३० हजार २४६ आस्थापना, गाळ्यांचे महिलांनी सर्वेक्षण केले.

आणखी वाचा- पुण्यातील सारथी मुख्यालय, शिक्षक भवनाच्या बांधकामाची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी

उपयोजनच्या (ॲप) माध्यमातून अग्निशमन यंत्रणा उपलब्धता, मालमत्तांचे छायाचित्रे, विविध परवान्यांची माहिती संकलित केली जात आहे. ३० हजारपैकी केवळ १५६ व्यावसायिकांनी अग्निशमन विभागाचा दाखला घेतला आहे. तर, २९ जणांनी परवान्याचे वार्षिक नूतनीकरण केले आहे. १७७ जणांकडे सुरक्षा दाखला आहे. दोन हजार ७२८ जणांनी सुरक्षा साधने वापरली आहेत. तर, केवळ २७३ जणांकडे व्यवसाय परवाना आहे. तीन हजार ३६३ आस्थापनांकडे अग्निशम विभागाचा परवाना आहे. तर, २६ हजार ८८३ जणांकडे कोणताच परवाना नसल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. या आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे.

व्यावसायिक आस्थापनांचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण पूर्ण होताच अग्निशमन दाखला नसलेल्या आस्थापनांवर दंडात्मक, फौजदारी कारवाई केली जाणार आहे. -प्रदीप जांभळे, प्रभारी आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Story img Loader