लोणावळ्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. आज सुट्टी असल्याने मुंबई, पुणे आणि पुणे जिल्ह्यातील विविध भागातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. लोणावळ्यातील भुशी धरणावर शेकडो पर्यटकांनी गर्दी केल्याने भुशी धरण हाऊसफुल झाले आहे. टायगर, लॉयन्स पॉईंट या ठिकाणी पर्यटकांनी एकच गर्दी केल्याचं बघायला मिळालं.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीच औचित्य साधून हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. लोणावळ्यामध्ये टायगर आणि लाइन्स पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्याचबरोबर भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट या ठिकाणी गर्दी केलेली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणि पुणे, पिंपरी- चिंचवड, मुंबई परिसरातून पर्यटक लोणावळ्यात येत असतात. आज 15 ऑगस्ट पासून स्वातंत्र्यदिनानिमित्त औचित्य साधून अनेक पर्यटक लोणावळ्यात कुटुंबासह दाखल झाले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लोणावळ्याचे सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. ते चित्र आज भुशी धरणावर बघायला मिळालं. भुशी धरणावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

Rain with strong gale in Karjat taluka lightning struck house in Kopardi
कर्जत तालुक्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, कोपर्डी येथे घरावर वीज कोसळली
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Extra bus service for Saptshrung Fort in navratri 2024
नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा
What is the mystery of the sound coming from the forest in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यातील जंगलातून येणाऱ्या आवाजाचे गूढ काय?
Kaas plateau huge tourist crowd
कास पठारावर पर्यटकांची गर्दी; पुन्हा वाहतूक कोंडी
police arrested thieves who ransacked shop in Andarsul Shiwar Yevla taluka
नाशिक : दुकान फोडणारे दोन जण ताब्यात
Soyabean crop in danger due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात जास्तीच्या पावसाने सोयाबीनचे पीक धोक्यात
Wardha dead bodies reservoir, Wardha,
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात