परिवहन विभागाची परवानगी नसताना ॲपद्वारे दुचाकीवरुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकाने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याची घटना घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दुचाकीस्वाराच्या विरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> पुणे : श्वानावर चुकीचे उपचार केल्याचा आरोप; डॅाक्टरकडे पाच लाखांची खंडणी मागणारे अटकेत
पिंटू घोष असे गुन्हा दाखल केलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मोटार वाहन निरीक्षक रहीम मुल्ला (वय ४०) यांनी या संदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रॅपीडो बाईक टॅक्सी या ॲपद्वारे दुचाकीवरुन प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. या सेवेला परिवहन विभागाने परवानगी दिली नाही. प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) दुचाकीवरुन प्रवासी वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. आरटीओतील अधिकाऱ्यांनी ग्राहक असल्याचे भासवून ॲपवर नोंदणी केली. त्यानंतर घोष विश्रांतवाडी भागात आला.
हेही वाचा >>> १ हजार ३५० डिटोनेटरच्या स्फोटानंतरही चांदणी चौकातील पूल पूर्णपणे का पडला नाही? अधिकारी म्हणाले, “कारण…”
घोष विश्रांतवाडी भागात आला. आरटीओ अधिकारी मुल्ला यांनी घोषला थांबवून त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. घोष याच्या दुचाकीवर मागे आरटीओतील महिला अधिकारी बसली होती. कारवाई सुरू करताच घोषने महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली. त्याला दुचाकी थांबविण्यास सांगण्यात आले. घोष भरधाव वेगात तेथून पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक शरद माळी तपास करत आहेत.