पुणे : डाॅक्टर महिलेचा विनयभंग करून पतीला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकास अटक केली.अतुल वसंत घुले (वय ४२, रा. मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका डाॅक्टर महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा मांजरी भागात दवाखाना आहे. आरोपी घुले याची दवाखान्याशेजारी खाणावळ आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
आरोपी घुले उपचाराचा बहाणा करून दवाखान्यात यायचा. घुले याने डाॅक्टर महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करुन लज्जास्पद वर्तन केले.घुले याने डाॅक्टर महिलेचा पाठलाग करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या डाॅक्टर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.
First published on: 03-05-2023 at 09:26 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threatened to kill husband by molesting doctor woman pune print news rbk 25 amy