डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणारे पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना तपास थांबविण्यासाठी धमकीचा मॅसेज आला आहे. याप्रकरणी घोडके यांनी खडकी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली असून, सीबीआयच्या पथकाने धमकी देणे, शिवीगाळ करणे इत्यादी कलमांखाली अज्ञाताविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. दाभोलकर हत्येचा तपास थांबवला नाही, तर जीवे मारण्यात येईल, असा मॅसेज घोडके यांच्या मोबाईलवर आला होता. त्यानंतर घोडके यांनी सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱयांना याबाबत माहिती दिली. सीबीआयमधील वरिष्ठांच्या सुचनेनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मॅसेज आलेल्या नंबरच्या आधारे संशयिताचा शोध सुरू आहे.
चंद्रकांत घोडके हे राज्य पोलीस दलातील यवतमाळचे अधिकारी आहेत. दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लवकरात लवकर लागावा, यासाठी सीबीआयच्या पथकाला मदत करण्यासाठी राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्या पथकात चंद्रकांत घोडके यांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा