पुणे: मी पिंपरी- चिंचवडचा भाई आहे. माझ्यावर मर्डरची केस आहे. (प्लॉटिंग) चा व्यवसाय करायचा असेल तर मला दरमहा दहा हजार हप्ता द्यावा लागेल. तो न दिल्यास खलास करेल अशी धमकी देऊन ७८ हजार रुपये घेऊन फरार झालेल्या खंडणीखोर भाईला खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सुधीर सोपान जाधव असं सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर खून आणि बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल आहे.
आणखी वाचा- पिंपरी : ‘चांगल्या पगाराची नोकरी पण त्यात मन लागत नाही… ‘; उच्चशिक्षित तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड च्या तळवडे येथे (प्लॉटिंग) चा व्यवसाय करणाऱ्या तक्रारदाराने खंडणी विरोधी पथकाकडे येऊन आरोपी सुधीर हा धमकी देऊन खंडणी मागत असल्याची तक्रार केली होती. तू प्लॉटिंगमध्ये भरपूर पैसे कमावले आहेस. माझ्यावर मर्डरची केस आहे. मी पिंपरी- चिंचवडचा भाई आहे. तुला प्लॉटिंगचा व्यवसाय करायचा असल्यास दरमहा दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. असे म्हणून गुगल पे द्वारे आणि रोख असे एकूण ७८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच, पोलिसांकडे तक्रार दिल्यास खलास करेल. आणखी दोन लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा तुझ्या मुलाचा मर्डर करेल अस म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. अशी माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांना दिली.

आणखी वाचा- ‘त्या’ पराभवामुळे शिंदे फडणवीस सरकारला पुण्याच्या मिळकतकरात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय घ्यावा लागला : आमदार रविंद्र धंगेकर

तातडीने या प्रकरणी तपास करत खंडणी विरोधी पथकाने कुरुळी- मोई रोडवरून आरोपी सुधीर ला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. अशा खंडणी बाबत आणखी तक्रारी असल्यास पुढे येऊन नागरिकांनी द्याव्यात त्या व्यक्तीच नाव गुप्त ठेवण्यात येईल असं आवाहन अरविंद पवार यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threats to businessmen anti extortion squad arrested gangster kjp 91 mrj
Show comments