लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांनी व्याजाच्या पैशांसाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा-गणेशोत्सवाच्या काळात पिंपरीत चोरीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके; दामिनी पथक सज्ज
अजय सिंग दुधानी (वय ३२) , निहालसिंग टाक (वय ३०) आणि बच्चनसिंग भोंड (वय ३०, सर्व रा. रामटेकडी हडपसर) असी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सावकारांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राहुल बबन वताडे (वय २८, रा. मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अवताडे यांनी दुधानी, टाक, भोंड यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाच्या पैशांसाठी आरोपींनी त्यांना धमकावून दुचाकी ताब्यात घेतली होती. त्यानंतर तिघांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या अवताडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना पोलिसांनी अटक केली.