लाेकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: ऑनलाइन ॲपवरुन झालेली ओळख महाविद्यालयीन तरुणाला महागात पडली. तरुणाला आमिष दाखवून त्याचे ससून रुग्णालय परिसरातून अपहरण करण्यात आले. भाेसरी परिसरात तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याशी तिघांनी अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर आरोपींनी तरुणाला धमकावून त्याच्याकडील २८ हजार ५०० रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली.

याबाबत एका २१ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण तळेगाव दाभाडे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. एका ॲपवरुन तरुणाची आरोपींशी ओळख झाली होती. आराेपींनी त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्याला पुणे स्टेशन परिसरात भेटण्यास बाेलावले. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारजवळ तरुणाला माेटारीत बसण्यास सांगितले. फिरायला जाऊ असे सांगून आराेपींनी त्याला माेटारीतून भाेसरी एमआयडीसी परिसरात नेले.

हेही वाचा… पोलिसांचे ‘कानावर हात’

भाेसरी एमआयडीसी परिसरात निर्जन जागी आरोपींनी त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. तरुणाला धमकावून ऑनलाइन पद्धतीने त्याच्या खात्यातील २८ हजार ५०० रुपये काढून घेतले. त्यानंतर तरुणाला साेडून तिघेजण माेटारीतून पसार जाले. पाेलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.