भिडे पुलाजवळ नदीपात्रातील मोकळ्या जागेत झालेल्या तरुणाचा खुनाचा छडा डेक्कन पोलिसांनी लावला. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. मामेभावाने साथीदारांशी संगनमत करून तरुणाचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.नरेश गणेश दळवी (वय ३०), अजय शंकर ठाकर (वय २५), समीर कैलास कारके (वय २६, रा. सर्व. उर्से. ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गणेश सुरेश कदम (वय ३५, रा. अमृतेश्वर मंदिराजवळ, शनिवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. आरोपी नरेश गणेश कदमाचा मामेभाऊ आहे. कदम याचा लॉन्ड्री व्यवसाय आहे. सोमवारी (२६ सप्टेंबर) दुपारी भिडे पुलाजवळ नदीपात्रात कदम मृतावस्थेत पडला होता. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. डेक्कन पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तसेच तांत्रिक तपासात आरोपी उर्से परिसरातील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून दळवी, ठाकर, कारके यांना ताब्यात घेतले. दळवी आणि कदम यांच्यात वाद झाला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा