किरकोळ वादातून जनता वसाहत परिसरात रिक्षा चालकाचा खून करुन पसार झालेल्या तिघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली.विनाेद वामन आल्हाट (वय ३७), अनिकेत बाळू नांगरे (वय २४), आकाश संतोष देवरुखे (वय २६, तिघे रा. सर्व्हे क्रमांक १३०, दांडेकर पूल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी आणि रिक्षा चालक अक्षय रावडे (वय २६, रा. धायरी) मित्र आहेत. स्वारगेट परिसरात अक्षयचा आरोपींशी किरकोळ वाद झाला होता. आरोपींना दारु पिण्याचे व्यसन असल्याने अक्षयने त्यांना टोमणा मारला होता. या कारणावरुन आरोपी त्याच्यावर चिडले होते.
हेही वाचा >>> महिलांकडे अश्लील नजरेने बघणाऱ्या तरुणाला हटकले; हटकणाऱ्या दोघांचा खून
त्यानंतर आरोपींनी अक्षयला जनता वसाहतीतील कालव्याजवळ नेले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा मृत्यू झाल्याचे शनिवार सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी आल्हाट, नांगरे, देवरुखे यांना पोलिसांनी पकडले. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकात कामठे, किशोर तनपुरे, हवालदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, दयानंद तेलंगे-पाटील, पुरुषोत्तम गुन्ला आदींनी ही कारवाई केली.