पिंपरी  : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्ताल्याचा खंडणी विरोधी पथकाने तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. माथाडी कामावरून झालेल्या वादानंतर ठरावीक उद्देश साध्य करण्याच्या हेतूने पिस्तूल मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले. किशोर बापू भोसले ( वय ३१, रा. पुनावळे गावठाण) आणि अमित  दत्तात्रय पाटूळे ( वय २३,  शिंदेवस्ती चौक, रावेत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सराईत गुन्हेगार किशोर भोसले व अमित पाटुळे हे कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुनावळे येथील स्मशानभूमी येथे येणार असून त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकातील पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी पिस्तूल  पुनावळे येथील अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले याच्या सांगण्यावरून तडीपार आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार याच्याकडून आणले असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : लोनॲपद्वारे कर्ज तरुणीला पडले महाग; तीन हजार रुपयांसाठी गेले एक लाख!

पोलिसांनी धनज्याला अटक केली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता माथाडी कामावरून झालेल्या वादानंतर ठरावीक उद्देश साध्य करण्याचे हेतूने पिस्तूल मागविल्याचे उघड झाले. अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध हिंजवडी व वाकड पोलीस ठाणे येथे दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.