लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: भरधाव टेम्पोने मोटारीला धडक दिल्याने मोटारीतील दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-नगर महामार्गावरील शिरुर परिसरात घडली. अपघातात तिघेजण जखमी झाले.

अनिता राजू बोरुडे (वय ४०), योगिता सुनील बोरुडे (वय ४०), राजू अशोक शिंदे (वय २५, रा. कात्राबाज मांडवगण, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात किशोरी सुनील बोरुडे (वय १७), तसेच टेम्पोचालक श्रीराम बापू मांडे, धीरज कांतीलाल लोखंडे (रा. बेलवंडी कोठार, ता. श्रीगोंदा) जखमी झाले आहेत. जखमींवर शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी टेम्पोचालक श्रीराम मांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश निवृत्ती बोरुडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… आता तृतीयपंथी फोडणार दहीहंडी, देशातील पहिल्या चार गोविंदा पथकांची पुणे-पिंपरीत स्थापना

रविवारी सायंकाळी पुणे-नगर महामार्गावरुन मोटार निघाली होती. न्हावरा गाव परिसरात मालवाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोने मोटारीला धडक दिली. मोटारीतील अनिता बोरूडे, योगिता बोरूडे, राजू शिंदे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारीतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच अनिता, योगिता, राजू यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ नगर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three died and three people were injured in an accident between a tempo and a car on pune nagar road pune print news rbk 25 dvr
Show comments