चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे. मतदानादरम्यान तीन ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड झाला आहे. तर, ‘मॉकपोल’ दरम्यान आठ मतदार यंत्रामध्ये बिघाड असल्याचे समोर आले होते.
हेही वाचा- Kasba Constituency By-Elections : ज्येष्ठ मतदारांना व्हिलचेअरचा आधार
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के मतदान झाले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख ६८ हजार ९६४ मतदार आहेत. त्यापैकी ५९ हजार ४३७ मतदारांनी ११ वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.
चिंचवडमध्ये २१०० ईव्हीएम मशिन आहेत. प्रत्यक्ष मतदान सुरु झाल्यानंतर तीन ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाला आहे. त्या मशिन बदलल्या आहे. तर, मतदान होण्यापूर्वी मॉकपोलच्या वेळेस आठ मशिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. त्या मशिन बदलून दिल्या आहेत. मशिन बिघण्याचे प्रमाण ०.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.