लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कल्याण-नगर मार्गावर आळेफाटा परिसरात भरधाव मोटारीने पाच परप्रांतीय शेतमजुरांना धडक दिली. अपघातात तिघांचा मृत्यू झाला. अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
man dies after falling into hole dug in Chembur by mumbai municipality
चेंबूरमध्ये पालिकेने खोदलेल्या खड्यात पडून इसमाचा मृत्यू, कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
samruddhi expressway 233 deaths
दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना

जगदीश महेंद्रसिंह डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण मूळचे मध्यप्रदेशातील आहेत. दिनेश जाधव, विक्रम तारोले गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डावर, मांजरे, तारोले, जाधव शेतमजूर आहेत. ते मजुरीसाठी आळेफाटा परिसरात आले होते. रविवारी रात्री (२४ सप्टेंबर) साडेआठच्या सुमारास ते कल्याण-नगर मार्गावरील कठेश्वर पुलावरुन निघाले होते. पुलाच्या परिसरात अंधार होता. भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली.

हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय अस्थिरता…’

अपघातात डावर, मांजरे, तारोले, जाधव गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन कांडगे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मजुरांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच डावर, मांजरे, तारोले यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader