राहुल खळदकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ धावत्या ट्रकने पेट घेतल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी साडेआठच्या सुमारास घडली. त्यामध्ये एक पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने आग आटोक्यात आणली. बाह्यवळण मार्गावरुन सोमवारी रात्री आठच्या सुमारास ट्रक निघाला होता. नवले पूल स्वामी नारायण मंदिर परिसरात धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला.
हेही वाचा >>> पुणे: ‘मेफेड्रोन’साठी कच्चा माल पुरविणारे सहा आरोपी निष्पन्न; ललित पाटीलसह आरोपींचा शोध सुरू
या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या सिंहगड रस्ता केंद्रातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकने पेट घेतल्यानंतर जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रकने पेट घेतल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळी क्रेन मागविली. ट्रकच्या केबीनमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ट्रक बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.