बारामती-मोरगाव रस्त्यावर भरधाव मोटारीने पादचाऱ्यासह दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
हेही वाचा >>>पुणे : ऑनलाइन पीएच.डी.ला मान्यता नाही ; युजीसीकडून स्पष्ट इशारा
अपघातात पादचारी दशरथ साहेबराव पिसाळ (वय ६२, रा. फोंडवाडा, माळवाडी, ता. बारामती, जि. पुणे), दुचाकीस्वार अतुल गंगाराम राऊत (वय २२), त्याची आई नंदा यांचा मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील सहप्रवासी नंदा राऊत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा >>>पुणे : शहरात तीन ठिकाणी आग ; रविवार पेठ, नेहरु रस्ता, हडपसर भागात आगीच्या घटना
बारामती- मोरगाव रस्त्याने भरधाव मोटार पुण्याकडे निघाली होती.सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीस्वार अतुल राऊत आणि सहप्रवासी नंदा बारामतीकडे निघाले होते. फोंडवाडा गावाजवळ भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार अतुल, सहप्रवासी नंदा गंभीर जखमी झाल्या. त्या वेळी तेथून निघालेले दशरथ पिसाळ यांनाही धडक देऊन अपघातग्रस्त मोटार घटनास्थळी सोडून मोटारचालक पसार झाला. अपघात नेमका कसा झाला, याची पोलिसांकडून माहिती घेण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, सलीम शेख तपास करत आहेत.