Water Tank Collapse in Pune Pimpri-Chinchwad पिंपरी- चिंचवड शहरातील भोसरीमध्ये पाण्याची टाकी कामगारांच्या अंगावर कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा ते सात कामगार गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दल, पिंपरी- चिंचवड पोलीस दाखल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भोसरीतील सद्गुरु नगर मध्ये लेबर कॅम्प मध्ये राहणाऱ्या मजुरांसाठी बारा फूट उंचीवर पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. आज सकाळी आठच्या सुमारास काही कामगार पाण्याच्या टाकीखाली अंघोळ करत होते. तेव्हा, निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेली पाण्याची टाकी कोसळली. जागीच पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सहा ते सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लेबर कॅम्प उभारण्यात आला होता ती जागा रेड झोनची असल्याचे समजते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उपायुक्त मनोज लोणकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.  टाकी महापालिकेने उभारलेली नव्हती. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे जांभळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three laborers died after a water tank collapsed in pimpri chinchwad kjp 91 amy