हडपसर भागात दुकानदारांकडे दरमहा हप्ता मागून कोयया गँगने दहशत माजविल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.अजय साळुंके, शुभम गवळी, सुदाम साळुंके अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत हिराराम चेनाराम देवासी (वय ३४, रा. शेवाळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे: सडक सख्याहरीच्या त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न;ओैंध भागातील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिराराम यांचे शेवाळवाडी भागात चैतन्य स्वीट मार्ट मिठाई  विक्रीचे दुकान आहे. आरोपी साळुंके, गवळी, साळुंके मिठाई विक्री दुकानात आले. त्यांनी बाकरवाडी, पाणी, शीतपेयाची बाटली घेतली. देवासी यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले. तेव्हा तुम्ही बाहेरू येऊन व्यवसाय करतात. व्यवसाय करायचा असेल, दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली. आरोपींनी कोयते उगारुन दहशथ माजविली.

हेही वाचा >>> पुणे मेट्रोमध्ये भूमीपुत्रांना नोकर्‍या मिळाल्याच पाहिजे, ठाकरे गटाकडून पुण्यात आंदोलन

या भागातील प्रत्येक दुकानदाराने दरमहा हप्ता न दिल्यास जीवे मारु. या भागात व्यवसाय करु दिला जाणार नाही, अशी धमकी देऊन दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे तपास करत आहेत.