पुण्यातील सोमवार पेठेतील एका एटीएम केंद्रातून तीन अल्पवयीन मुलांनी रोकड चोरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने तिन्ही मुलांना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा- पुणे : कात्रज तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

पोलिसांकडून तिनही अल्पवयीन आरोपी ताब्यात

सोमवार पेठेतील एका बँकेच्या एटीएम केंद्रात जाऊन रोकड चोरण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत अल्पवयीन मुले होते. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. अल्पवयीन मुले सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात एका मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, दत्ता सोनवणे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, शुभम देसाई, विठ्ठल साळुंखे आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader