लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गणेशोत्सवातील मिरवणुकीत झालेल्या वादातून युवकावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता भागातील वडगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. हडपसर भागातील रामटेकडी परिसरात वैमनस्यातून महाविद्यालयीन युवकाचा भर रस्त्यात खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. वैमनस्यातून शहरात दुसरा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

श्रीपत अनंत बनकर (वय १७, निवृत्तीनगर, वडगाव बुद्रक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीपत बनकर आणि अल्पवयीन मुले निवृत्तीनगर भागात राहायला आहेत. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत श्रीपत आणि अल्पवयीनांमध्ये वाद झाला होता. तेव्हापासून अल्पवयीन मुले त्याच्यावर चिडून होती. मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीपत मित्रासोबत दुचाकीवरुन निघाला होता. त्यावेळी तीन अल्पवयीन चरवड वस्ती भागातून निघाले होते.

आणखी वाचा-पोलिसांचे चित्रीकरण केल्याप्रकरणी दाखल गुन्हा दोन वर्षांनी रद्द, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

अल्पवयीनांनी हाक मारुन श्रीपतला थांबवले. आमच्याकडे रागाने का बघतो? अशी विचारणा त्यांनी त्याच्याकडे केली. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. अल्पवयीनांनी श्रीपत याच्यावर कोयत्याने वार केले, तसेच त्याच्या डोक्यात दगड घातला.गंभीर जखमी झाल्याने श्रीपतचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अल्पवयीन मुले पसार झाली होती,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष भांडवलकर आणि पथकाने पसार झालेल्या अल्पवयीनंना पर्वती टेकडी परिससत ताब्यात घेतले.

सिंहगड रस्ता परिसरात खुनाची दुसरी घटना

सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरुन अल्पवयीनांनी दाेन महिन्यांपूर्वी युवकावर कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर वडगाव बुद्रुक भागातील चरवड वस्ती परिसरात मंगळवारी रात्री वैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार करुन खून केला.

Story img Loader