लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत (डीपीसी) केवळ महायुतीतील आठ आमदारांनी सुचविलेल्या ३२७ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली होती. पण, महाविकास आघाडीतील तीन आमदारांना निधी देण्यात हात आखडता घेतला होता. या तिन्ही आमदारांना निवडणुकीत याचा फटका बसल्याचे मानले जाते. मात्र, महायुतीतील दोन आमदारांना निधी देऊनही पराभव पत्करावा लागला असल्याने निधीवाटप हे पराभवाचे एकमात्र कारण ठरले नसल्याचेही स्पष्ट होत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील सर्व भागांतील विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षासाठी १,२५६ कोटी रुपयांचा सर्वसाधारण आराखडा आणि आदिवासी उपाययोजनांतून १६० कोटी रुपयांच्या स्वतंत्र आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. तत्कालीन पालकमंत्री पवार यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी निधी वाटपाला मंजुरी दिली. महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या आमदारांनी, त्यांच्या मतदारसंघांतील विकासकामांबाबत सुचविलेल्या कामांच्या याद्या जिल्हा नियोजन समितीकडे दिल्या. त्यानुसार आमदार दिलीप वळसे पाटील यांना (आंबेगाव) ४२ कोटी रुपये, दत्तात्रेय भरणे (इंदापूर) ४४ कोटी, सुनील शेळके (मावळ) ४० कोटी, राहुल कुल (दौंड) ३४ कोटी, अतुल बेनके (जुन्नर) ४० कोटी, दिलीप मोहिते पाटील (खेड आळंदी) ३६ कोटी, भीमराव तापकीर (खडकवासला) १२ कोटी आणि स्वत: अजित पवार (बारामती) ६५ कोटी, अशी एकूण ३२७ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. संग्राम थोपटे (भोर), अशोक पवार (शिरूर) आणि संजय जगताप (पुरंदर) यांनी सुचविलेल्या विकासकामांना निधी देण्यात आला नव्हता.
आणखी वाचा-पुणे : वारजे भागात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणीचा मृत्यू
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी पुरंदर आणि भोर मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप हे आमदार होते. तेथून सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळाले नव्हते. त्यामुळे या दोन मतदारसंघांतील आमदारांना निधी देण्यात पालकमंत्र्यांनी हात आखडता घेतल्याचे बोलले जाते.
आणखी वाचा-पिंपरीत आर्थिक वादातून कुऱ्हाडीने वार करून हत्या; रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह आरोपी…
जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून मतदारसंघातून सुचविलेल्या विकासकामांच्या याद्या पाठविण्यात आल्या होत्या. या याद्या हेतुपुरस्सर बाजूला ठेवण्यात आल्या. कुठलाच निधी मंजूर करण्यात आला नाही. प्रभागातील विकासकामे रखडली. विरोधातील आमदारांच्याबाबतीत असे जाणीवपूर्वक राजकारण करण्यात आले आहे. माझा पराजय झाला मला मान्य आहे. मात्र, विकासकामांमध्ये खोडा घालून विजय मिळवणे म्हणजे फार मोठे कर्तृत्व नाही. -अशोक पवार, उमेदवार, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष, शिरूर