पिंपरी- चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी स्पार्कल कॅण्डल बनवणाऱ्या कारखान्यामध्ये आग लागून आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शुभांगी सुतार, नजीर अमीर शिकलकर आणि सागर रमेशचंद भक्कड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी तळवडे या ठिकाणी असलेल्या स्पार्कल कॅण्डल बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागून नऊ महिलांचा मृत्यू झाला तर सात जणांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गंभीर घटने प्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी शरद सुतार हा दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तळवड्यातील घटना गंभीर असल्याने राजकीय नेते स्थानिक नेते घटनास्थळी भेट देत आहेत.

आणखी वाचा-मनसेने रोखली डेक्कन क्वीन, लोणावळा-पुणे लोकलच्या वाढीव फेऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन

दरम्यान, या घटनेत जागीच होरपळून सहा महिलांचा मृत्यू झाला होता. मृतदेह ओळखण्यास देखील शक्य नव्हते, त्या सहा महिलांच्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली असून त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. शनिवार आणि रविवार या दिवशी शासकीय सुट्टी असताना पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबत पाठपुरावा करून ‘डीएनए’ चाचणीचे अहवाल मिळवले असून त्या सहा जणांवर आज सोमवारी निगडीतील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.