लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात कोयता गँगने दहशत माजवून तीन तरुणांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी दहाजणांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध

करण आगलावे (वय २२), राहुल शेंडगे (वय २२), रोहन शेंडगे (वय २१), अभिषेक ससाणे (वय ३३), महेश आगलावे (वय २०), स्वस्तिक खवले (वय २२), रोहित थोरात (वय २४), लक्ष्मण जाधव (वय २३), शंकर कोंगाडी (वय २४), रोहित आगलावे (वय २४) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सराइतांची नावे आहेत. सुलतान चाँद शेख (वय २७, रा. लोहियानगर ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

हेही वाचा… पुणे : घरात घुसून १६ वर्षीय मुलीवर गुंडाने केला बलात्कार

सुलतान शेख आणि त्याचे मित्र टिंबर मार्केट भागात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी करण आगलावे आणि साथीदार तेथे आले. रोहित आगलावेला मारहाण का केली, अशी विचारणा करणने सुलतानकडे केली. त्यानंतर करणने सुलतानवर कोयत्याने वार केले. सुलतानबरोबर असलेले मित्र अलीश शेख, अकबर यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. पोलीस उपनिरीक्षक विटे तपास करत आहेत.

शहरात गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा कोयते उगारुन दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोयता गँगच्या दहशतीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Story img Loader