लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : एरंडवणे भागात कर्नाटक शाळेजवळ भरधाव मोटारीने तीन शाळकरी मुलींना धडक दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अपघातात तिघी जखमी झाल्या असून, एकीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

आणखी वाचा-नेपाळमध्ये भूकंप; पुण्यातील ३९ पर्यटक सुरक्षित

कोथरुडमधील निंबाळकर बागेकडून भरधाव मोटार एरंडवणे भागातील गणेशनगरकडे निघाली होती. शाळकरी मुली पदपथावरुन निघाल्या होत्या. गुळवणी महाराज रस्त्यावर रिव्हाइव्ह केअर अँड ब्युटी स्टुडिओ या दुकानासमोर मोटारीवरील चालक महिलेचे नियंत्रण सुटले. मोटार पदपथावर शिरली. पदपथावरुन निघालेल्या तीन मुलींपैकी दोघी फेकल्या गेल्या. एक मुलगी मोटारीच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर नागरिकांनी तिघींना तातडीने एरंडवणे भागातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती अलंकार पोलिसांना कळविण्यात आली. अपघातानंतर मोटार चालक महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.