लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: आई रागावते म्हणून लोणीकाळभोरमधील तीन भावंडे घरातून बेपत्ता झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकांनी तातडीने तपास सुरु केला. लष्कर परिसरात तीन भावडांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबत एका महिलेने लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. लोणीकाळभोर परिसरातील कदमवाक वस्तीत महिला राहायला आहेत. तिचे पती लोणी रेल्वे स्थानक परिसरात काम करतात. महिलेला तीन लहान मुले आहेत. प्रापंचिक व्यापामुळे महिला नऊ वर्षाच्या मुलीला रागावली. त्यामुळे मुलीला राग आला. त्यानंतर ती लहान बहीण आणि भावाला घेऊन घरातून बाहेर पडली. रात्री उशीरापर्यंत मुले घरी न परतल्याने महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

आणखी वचा- लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक कोठावळे यांची निवड

तीन मुले एकाचवेळी बेपत्ता झाल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील चार पथकांनी मुलांचा शोध सुरु केला. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाक वस्तीपासून वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासण्यात आले. तीन मुले बसने पुण्याकडे गेल्याचे चित्रीकरणात आढळून आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पुणे शहरातील मध्यभागात मुलांचा शोध सुरु केला. मध्यरात्री लष्कर भागातील कुरेशी मशीदीबाहेर तीन मुले पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन आईच्या ताब्यात दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three siblings who left because their mother was angry returned home safely because of police pune print news rbk 25 mrj