लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: गाय, बैलांची कत्तल करून तीन हजार किलो गोमांस घेऊन जाणाऱ्या पाच जणांवर चाकण पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.१७) सकाळी साडेसहा वाजता शिक्रापूर चाकण रोडवर करण्यात आली.
मोहिद रियाजत खान (वय ४०, रा.घाटकोपर, मुंबई), पिकअप चालक अमीर अहमद रशिद अहमद शेख (वय ४४, रा.कल्याण) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, पिकअप मालक याकूब अहमद शेख (रा.ठाणे), इरफान शेख आणि रफीकभाई इद्रेसी (रा.जामखेड, अहमदनगर) यांच्या विरोधात पशुसंवर्धन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल शेख यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आणखी वाचा-बैलगाडा शर्यतीसाठी ११ वर्षे पाठपुरावा करणारे भाजपचे आमदार महेश लांडगे म्हणाले, “हा ऐतिहासिक निकाल…”
गोवंश कापणे, वाहतूक करणे, विक्री व खरेदी करण्याकरिता बंदी आहे. आरोपींनी गाय, बैलांना बेकायदेशीरपणे कापले. त्यांचे मांस धड, पाय, मुंडकी, कातडी असे तीन हजार किलो वजनाचे गोमांस घेऊन चालले होते, असे पोलिसांनी सांगितले.