लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरात गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना वाढत आहेत. कल्याणीनगर अपघाताची घटना मोटारचालक अल्पवयीन मुलाच्या बेपर्वाईमुळे घडली होती. हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांसह सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर अष्टापूर परिसरात शोककळा पसरली.

st bus accident pune solapur
पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
college youth died, bullet hit the divider in pune,
पुणे : बुलेट दुभाजकावर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू, बुलेटच्या धडकेत पादचारी ज्येष्ठासह दोघे जखमी
Terrorism started by gangs in Pune crime news Pune news
निवडणुकीच्या तोंडावर शहरात टोळक्याकडून दहशतीचे प्रकार – वारजे, पर्वती, चंदननगर पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल
Bengaluru building collapse
Building Collapses: पत्त्यासारखी कोसळली इमारत; ५ जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, थरारक व्हिडीओ व्हायरल
Shalimar express
नागपूर: शालिमार एक्स्प्रेस रुळावरून घसरली, प्रवासी जखमी
man hit his father on head with an iron rod after arguments in amravati
अमरावती : रागातून उद्भवला वाद; मुलाने लोखंडी बत्त्याने वडिलांच्या डोक्यावर…
thane hit and run
ठाणे: हीट अँड रन प्रकरणातील मर्सिडीज अवघ्या ‘पावणे चार लाखा’ची, २००८ चा मॉडेलची मोटार आरोपीने केली होती खरेदी

प्रवीण सुनील पाटोळे (वय २८) आणि राजवीर प्रवीण पाटोळे (वय सहा दोघे रा. अष्टापूर, ता. हवेली, नगर रस्ता ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दुचाकीस्वार यश शेखावत (वय २१ रा. न्हावी सांडस फाटा, ता. हवेली, नगर रस्ता) गंभीर जखमी झाला होता. त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. उपचारादरम्यान यश शेखावत याचा मृत्यू झाल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली. याबाबत अक्षय पाटोळे (वय २९ ) यांनी फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-तरुणाकडून पोलीस अधिकाऱ्याची मालिश; कल्याणीनगरमधील घटनेची चित्रफित व्हायरल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार प्रवीण आणि त्यांचा मुलगा राजवीर शुक्रवारी (३१ मे) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घरी निघाले होते. यवत परिसरातील राहू गावाकडून अष्टापूरकडे भरधाव वेगाने दुचाकीस्वार यश शेखावत निघाला होता. दुचाकीस्वार शेखावतने समोरुन येणारे दुचाकीस्वार प्रवीण यांना धडक दिली. प्रवीण आणि त्यांचा मुलगा राजवीर गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वार शेखावत गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच दुचाकीस्वार प्रवीण आणि त्यांचा मुलगा राजवीर यांचा मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेखावतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक निलेश घोरपडे तपास करत आहेत.

आणखी वाचा-धक्कादायक! म्हाडाच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावावर पावणेतीन लाखांची लाच

अपघातात प्रवीण आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा राजवीर यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर अष्टापूर परिसरात शोककळा पसरली. नगर रस्ता, सोलापूर रस्ता परिसरात भरधाव वेगामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.