पुण्यामध्ये राज्यातील पहिल्या पर्यायी इंधन परिषदेचं उद्घाटन आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारपरिषदेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. यावेळी त्यांना राज्यातील पॉलिटकल प्रदूषण वाढलंय, यावर प्रतिक्रिया विचारली असता “थ्री व्हीलरचं चांगलं चाललय” असं उत्तर देत त्यांनी राजकारणावर अधिक बोलणं टाळलं.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “पुण्यात आज इलेक्टिक दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले आहे. या प्रदर्शनाला पुणेकर नागरिक नक्कीच प्रतिसाद देतील.” तसेच, “मी राज्यात अनेक भागात दौऱ्यानिमित्त जातो, तेव्हा इलेक्ट्रिक बाइक पाहण्यास मिळतात हे पाहून नागरिकांमध्ये जनजागृती झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या तीन वर्षांत राज्यातील सर्व ठिकाणी चार्जिंग स्टेशन दिसतील.” असं देखील त्यांनी बोलून दाखवलं.
याचबरोब, प्रामुख्याने सध्याची परिस्थिती लक्षात घेता, पेट्रोल, डिझेलपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना खर्च कमी येत असल्याचेही त्यांनी आदित्य ठाकरे म्हणाले.